Category: Travel

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, इतिहास, धार्मिक ठिकाणे, निसर्गरम्य ठिकाणे, समुद्रकिनारे, हिल स्टेशन्स, साहसी पर्यटन आणि व्हॅकेशन प्लॅनिंगच्या माहितीसाठी. पुणे, नासिक, अजिंक्यतारा, लोनावळा, महाबळेश्वर, माथेरान, गणपतीपुळे, त्र्यंबकेश्वर, शिरडी, तुळजापूर सारख्या प्रसिद्ध ठिकाणांची माहिती आणि प्रवास टिप्स.

  • Tikona Fort: तिकोना किल्ला: इतिहास, निसर्ग आणि साहसाचा त्रिकोणी संगम

    Tikona Fort: तिकोना किल्ला: इतिहास, निसर्ग आणि साहसाचा त्रिकोणी संगम

    तिकोना किल्ला, तिकोना हा किल्ला तिकोनापेठ या गावाजवळ आहे. पावना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला हा त्याच्या त्रिकोणी आकारामुळे ओळखला जातो. त्रिकोणी आकारामुळेच या किल्ल्याला तिकोना नाव मिळाले असेल. तिकोना किल्ला पुण्यापासून ६० किमी तर लोणावळ्यापासून २५ किमी अंतरावर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी तिकोनापेठ गाव आहे. 

    हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. तिकोना नावाचा अर्थ त्रिकोणी आहे, कारण किल्ल्याची रचना त्रिकोणी स्वरूपाची आहे. हा किल्ला मावळ तालुक्यातील मुळशी धरणाच्या परिसरात स्थित आहे आणि पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे.

    तिकोना किल्ल्याचे महत्त्व:

    1. इतिहास: तिकोना किल्ल्याचा इतिहास सातवाहन आणि मराठा साम्राज्याशी जोडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. किल्ला मोगल, निजाम आणि मराठे यांच्यातील संघर्षाचा साक्षीदार आहे.
    2. भौगोलिक स्थिती: तिकोना किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचीवर आहे. किल्ल्याच्या माथ्यावरून मुळशी धरण, पवना धरण आणि आसपासचा परिसर सहज पाहता येतो.
    3. प्रवेशद्वार: तिकोना किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दगडी बांधकामाने तयार केलेले आहे. हे प्रवेशद्वार अतिशय आकर्षक आहे आणि त्यावर इतिहासाच्या खुणा दिसतात.
    4. प्रमुख आकर्षणे:
      • त्रिंबकेश्वर महादेवाचे मंदिर: किल्ल्याच्या माथ्यावर प्राचीन त्रिंबकेश्वर महादेवाचे मंदिर आहे.
      • तलाव: किल्ल्याच्या परिसरात पाण्याचे काही तलाव आहेत, जे पिण्यासाठी वापरण्यात येत असत.
      • बुरुज आणि दरवाजे: किल्ल्याच्या बुरुजांवरून आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहता येतो.
    5. सहलीसाठी योग्यता: तिकोना किल्ल्यावर ट्रेकिंग करणे सोपे आणि आनंददायी आहे. तिकोना हा किल्ला सोप्या श्रेणीत मोडतो त्यामुळे लहानांपासून-मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा किल्ला चढू शकते. 

    किल्ल्यावर पोहोचण्याचा मार्ग:

    1. रेल्वेने: तिकोनापासून लोनावळा हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. तेथून पवना धरणाकडे जाण्यासाठी स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे.
    2. रस्त्याने: पुण्याहून किंवा लोणावळ्याहून पवना धरण मार्गे गेला की तिकोना पेठ लागते. तेथून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे.

    भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ:

    तिकोना किल्ल्याला भेट देण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या कालावधीत निसर्गाच्या सौंदर्यात भर पडते.

    ट्रेकिंग टिप्स:

    योग्य ट्रेकिंग शूज वापरा.
    पुरेसे पाणी आणि खाद्यपदार्थ सोबत ठेवावे.

  • Lohagad Fort : लोहगड किल्ल्याचा इतिहास, प्रवास आणि निसर्गसौंदर्य | Lohgad Fort Trek Guide in Marathi

    Lohagad Fort : लोहगड किल्ल्याचा इतिहास, प्रवास आणि निसर्गसौंदर्य | Lohgad Fort Trek Guide in Marathi

    लोहगड किल्ला पुण्याहून ६० किलोमीटर आणि मुंबईपासून ८९ किलोमीटर अंतरावर आहे. ५ वर्ष मुघलांच्या ताब्यात असलेला लोहगड किल्ला शिवरायांनी १३ मे १६७० मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्यावर आपण तिन्ही ऋतूंमध्ये जाऊ शकतो. पावसाळ्यात हा किल्ला अतिशय निसर्गरम्य दिसतो. किल्याला भेट देण्याची वेळ सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० आहे

  • Lohagad Fort : लोहगड किल्ला: सुरतेच्या लुटीचा खजिना जपणारा ऐतिहासिक ठेवा

    Lohagad Fort : लोहगड किल्ला: सुरतेच्या लुटीचा खजिना जपणारा ऐतिहासिक ठेवा

    इ.स १६६५ मध्ये राजा मिर्झा जयसिंग यांच्या सोबत जो पुरंदरचा तह झाला होता. त्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील २३ किल्ले मुघलांच्या ताब्यात दिले होते. त्यामध्ये या किल्ल्याचा समावेश होता. हा किल्ला बोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. हा किल्ला शिवरायांनी स्वराज्यात केव्हा सामील करून घेतला. चला तर मंग जाणून घेऊया या किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती.

    लोहगड किल्ला पुण्याहून ६० किलोमीटर आणि मुंबईपासून ८९ किलोमीटर अंतरावर आहे. ५ वर्ष मुघलांच्या ताब्यात असलेला लोहगड किल्ला शिवरायांनी १३ मे १६७० मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्यावर आपण तिन्ही ऋतूंमध्ये जाऊ शकतो. पावसाळ्यात हा किल्ला अतिशय निसर्गरम्य दिसतो. किल्याला भेट देण्याची वेळ सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० आहे.

    समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३४२० फूट उंचीवर आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असल्यामुळे चढायला अगदी सोपा आहे. लोहगड हा किल्ला त्याच्या भव्य वास्तुकला, ऐतिहासिक महत्त्व आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.

    १) गणेश दरवाजा : गणेश दरवाजा हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. दरवाज्यावरील गणपतीच्या मूर्तीवरून या दरवाजाला गणेश दरवाजा असे नाव देण्यात आले.

    २) दिंडी दरवाजा : द्या दरवाज्यामधून आपल्याला बुरुजाच्या माथ्यावर जात येते. हा बुरुज युद्धकोणाच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वाचा होता.

    ३) महादरवाजा : महादरवाजा हा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे. मजबूत दगडांनी बांधलेला भक्कम दरवाजा आहे.

    ४) नारायण दरवाजा : नारायण दरवाज्याकडे जाताना आपल्याला एक धान्यकोठी दिसते. त्यामध्ये पूर्वी धान्य साठवले जायचे. हा नारायण दरवाजा १७८९ साली नाना फडणवीसांनी बांधला होता.

    ५) हनुमान दरवाजा : हनुमान दरवाजा हा लोहगडाचा मुख्य दरवाजा आहे. या दरवाज्यावर हनुमानाची मूर्ती कोर्लेलीया आहे त्यामुळे याला हनुमान दरवाजा नाव देण्यात आले असेल.

    ६) विंचूकडा : विंचूकडा हा विंचवाच्या नांगीसारखा दिसतो म्हणून  त्याला विंचूकडा म्हणतात. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकड्याचा उपयोग होत असावा.

    ७) लक्ष्मी कोठी : पहिल्या सुरत लुटीच्या वेळी आणलेला खजिना नेताजी पालकर यांनी लक्ष्मी कोठी मध्ये ठेवला होता.

    ८) महादेव मंदिर : या किल्ल्यावर एक महादेवाचे मंदिर आहे.

    ९) सोळा कोणी तलाव : महादेवाच्या मंदिरासमोर थोडसं चालत गेलो कि आपल्याला एक मोठे तळे लागते या तळ्याची बांधणी नाना फडणवीसांनी केली होती. हे तळं सोळा कोणी आहे.

    १०) घोड्याची पागा : घोड्यासाठी पाणी आणि चाऱ्याची सोया या ठिकाणी केली जात असेल.

    टिप:

    ट्रेकिंगसाठी आरामदायक कपडे आणि चांगले शूज घालावेत.
    पावसाळ्यात किल्ल्यावर जाण्यासाठी पावसापासून बचावासाठी छत्री किंवा रेनकोट ठेवावा.
    खाण्या-पिण्याच्या वस्तू सोबत घ्याव्यात, कारण किल्ल्यावर फार सुविधा उपलब्ध नसतात.
    लोहगड किल्ला हा निसर्ग, इतिहास आणि साहस यांचा उत्तम संगम आहे. किल्ल्याला भेट दिल्यास ऐतिहासिक वारसा अनुभवण्याबरोबरच निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येतो.